07 December 2019

News Flash

Video : व्हिडिओ गेममधून प्रभासच्या ‘साहो’चे प्रमोशन

हा गेम १५ ऑगस्टपासून प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध असणार आहे.

‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत अभिनेश्री श्रद्धा कपूर झळकणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी स्क्रीन शेअर करणार आहे. बाहुबलीनंतर प्रभासच्या आगामी साहोची क्रेज चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतेय. चाहत्यांमध्ये हा उत्साह काय ठेवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचा गेम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता. आता या गेमचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या गेमचे नाव ‘साहो द गेम’ असे आहे. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे गेमचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत ‘डार्लिंग्स, साहो गेमचा ट्रेलर प्रदर्शित करत आहे. तुम्ही जेट पॅक परिधान करुन साहो गेमच्या दुनियेत एण्ट्री करण्यास तयार आहात का?’ असे प्रभासने लिहिले आहे. या गेममध्ये अॅक्शनचा भरण्यात करण्यात आला असून गेम खेळणारा व्यक्ती नायकाच्या (प्रभासच्या) भूमिकेत शहरातील शत्रूंना मारणार आहे. दरम्यान गेम जिंकणाऱ्या स्पर्धकाला साहो गुडी बॅग आणि चित्रपटाची तिकिटे गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहेत. हैद्राबादमध्ये असणाऱ्या भारतातील एका प्रमुख गेम सर्विस कंपनीने हा गेम लॉन्च करण्याची जवाबदारी घेतली आहे. हा गेम १५ ऑगस्टपासून प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध असणार आहे.

https://www.instagram.com/tv/B1GCiR_Hf6H/?utm_source=ig_web_copy_link

‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ३० ऑगस्ट रोजी साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on August 13, 2019 6:44 pm

Web Title: prabhas saaho video game trailer is launch avb 95
Just Now!
X