News Flash

नव्या चित्रपटात दिसणार कधी न पाहिलेल्या रुपात; साऊथ सुपरस्टार प्रभासची घोषणा

सोशल मीडियावरून शेअर केलं नव्या चित्रपटाचं पोस्टर

बाहुबली म्हणून प्रसिद्धी मिळवलेला आणि घराघरात पोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभास अनेकांच्या गळ्यातल्या ताईत बनला आहे. देशाच्या सर्व भागात त्याचे चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी त्यानं दिलेल्या सरप्राईझमुळं सोशल मीडिया ‘प्रभासमय’ झाला आहे. प्रभासनं आपल्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

प्रभासचा ‘सलार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टरमध्ये प्रभास त्याच्या इतर भूमिकांपेक्षाही वेगळ्या अवतारात दिसत आहे. प्रभासचा या चित्रपटातला अवतार आत्तापर्यंत कधीही पाहायला मिळालेला नसेल असा असल्याचं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं. त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना प्रभास म्हणाला, “ या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे, यातलं माझं कॅरेक्टर एकदम हिंसक असणार आहे. अशी भूमिका मी या आधी कधी केलेली नाही. ही पॅन इंडियन फिल्म आहे. मला आता कधी एकदा सेटवर जातोय असं झालंय.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना प्रशांत नील म्हणाले की, आम्ही हे तुमच्यासोबत साजरं करण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही. ‘सलार’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत नील यांचं आहे ज्यांना केजीएफ या भारतातल्या सुपरहिट चित्रपटानंतर प्रसिद्धी मिळाली.

अभिनेत्री श्रुती हसनही या चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. प्रभास आणि श्रुती या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 5:15 pm

Web Title: prabhas shared a poster of his new film on social media vsk 98
Next Stories
1 राणा डग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ प्रदर्शनासाठी सज्ज; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 “मला त्यांना रिप्लाय द्यावासा वाटत होता”- वडिलांच्या मेसेजने इरफानचा मुलगा भावूक
3 ओटीटीवर गाजत असलेले ‘हे’ मराठी चित्रपट पाहिलेत का?
Just Now!
X