News Flash

…म्हणून प्रभास झाला भावूक

इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने एक पोस्टसुद्धा लिहिली आहे.

प्रभास

‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांची नावं भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अभिमानाने घेतली जातील. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कमाईचे नवे विक्रम रचले. नुकतंच ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस माझ्यासाठी कायम भावनिक असेल, अशी प्रतिक्रिया प्रभासने व्यक्त केली आहे. याविषयी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने एक पोस्टसुद्धा लिहिली आहे.

‘बाहुबली २’चा पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘दोन वर्षांपूर्वी बाहुबली : द कन्क्लुजन हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा दिवस कायम माझ्यासाठी भावनिक असेल. एस. एस. राजामौली आणि संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे. माझ्यावर आणि चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे खूप खूप आभार!’

प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, सत्यराज आणि रम्या यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत ५०० कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी कमाई केली होती. तर प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:14 pm

Web Title: prabhas shared emotional post on his instagram
Next Stories
1 Photo : उधम सिंग यांच्या भूमिकेतील विकी कौशल
2 उच्चशिक्षित मंत्री असतांनाही पाण्याचं नियोजन नाही – अण्णा हजारे
3 ऋषी कपूर कॅन्सरमुक्त; दिग्दर्शक राहुल रवैल यांची माहिती
Just Now!
X