19 September 2020

News Flash

Saaho Trailer : फुल ऑन अ‍ॅक्शनला प्रभास-श्रद्धाच्या रोमान्सचा ‘तडका’

या चित्रपटाचा अॅक्शनपॅक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा अॅक्शनपॅक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रभाससह बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे.

ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्सचा भरणा आहे. त्याबरोबरच प्रभास आणि श्रद्धाच्या रोमान्सचा तडखा आणि मनाला भिडणारे संवादही आहेत. ट्रेलरमधील अॅक्शन व दृश्ये एखाद्या हॉलिवूडपटाप्रमाणेच वाटतात. चित्रपटातील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते.

३० ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शित सुजीत करत आहेत. या चित्रपटात प्रभास, श्रद्धा आणि चंकी व्यतिरिक्त नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 7:40 pm

Web Title: prabhas starrer saaho action packed trailer is out now nck 90
Next Stories
1 Rakshabandhan 2019 : बॉलिवूडमधील बहीण- भावाच्या ‘या’ जोड्या माहितीयेत का?
2 …म्हणून २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ला २०१८ चे राष्ट्रीय पुरस्कार
3 पाकिस्तानला बॉलिवूड म्हणतंय; ‘इसमें तेरा घाटा…’
Just Now!
X