News Flash

प्रभासच्या लग्नाबाबत कुटुंबातल्या सदस्यानेच केला मोठा खुलासा..

मीडियाशी संवाद साधताना त्या व्यक्तीने खुलासा केला आहे

‘बाहुबली’ चित्रपटाच्या अद्भुत यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास जगभरता लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याच्या ‘साहो’ चित्रपटाने पुन्हा दमदार कमाई केली. प्रभास नेहमी त्याच्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रभासच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. आता प्रभासच्या कुटुंबातील एका सदस्याने प्रभासच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

तेलुगू सामाचारने दिलेल्या वृत्तानुसार प्रभासच्या मावशीने तो कधी लग्नबंधनात अडकणार आहे याचा खुलासा केला आहे. प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘जान’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर लग्न बंधनात अडकण्याचा विचार करत आहे. पण तो कोणाशी लग्न करणार हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

प्रभासची मावशी श्यामला देवी यांनी हा खुलासा केला आहे. ‘आम्ही सर्वजण प्रभासच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहोत. त्याच्या लग्नाच्या अफवा ऐकून आम्हाला देखील हसू येते. आमचे कुटुंब हे खूप मोठे आहे आणि या कुटुंबाशी जुळून घेईल अशा मुलीच्या शोधात आम्ही आहोत’ असा खुलासा श्यामला यांनी मीडियाशी बोलताना केला आहे.

प्रभास जानेवारी महिन्यात त्याचा आगामी चित्रपट ‘जान’ च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. हा चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार करणार आहेत. तसेत प्रभास सह अभिनेत्री पूजा हेगजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 3:28 pm

Web Title: prabhass aunt shyamala devi spills the beans on saaho actors wedding avb 95
Next Stories
1 वाढदिवशी सलमानला मिळाले मोठे गिफ्ट
2 आईच म्हणाली २२ वर्षांच्या तरुणीला डेट कर, अभिनेत्याचं स्पष्टीकरण
3 सलमान खानचं वय किती? माहितेय का?
Just Now!
X