News Flash

प्राचीच्या मदतीला धावून गेली श्रद्धा

‘रॉक ऑन २’मध्ये श्रद्धाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने प्राची नाराज झाली

फरहान अख्तरचा ‘रॉक ऑन २’ हा सिनेमा त्याच्या ट्रेलरमुळए आणि गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. फरहान, श्रद्धा कपूर, प्राची देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. आता हा सिनेमा गाण्यांवर आणि कॉन्सर्टवर आधारीत असल्यामुळे प्रमोशनच्या फण्ड्यांमध्ये कॉन्सर्टचा उपयोग करण्यात आला. फरहान आणि श्रद्धाची गाणी यावेळी ऐकायला मिळाली. या कॉन्सर्टला प्राचीनेही आवर्जुन हजेरी लावली होती. पण ही कॉन्सर्ट ती पाहिजे तशी काही एन्जॉय करु शकली नाही. कोणती तरी गोष्ट तिला सतावत होती. ती गोष्ट म्हणजे तिचा ड्रेस.

कॉन्सर्टमध्ये जेव्हा फरहान आणि श्रद्धा लाइव्ह कार्यक्रम करत होते तेव्हा ती प्रेक्षकांमध्ये बसून त्यांचे गाणे एन्जॉय करत होती. पण जेव्हा ‘रॉक ऑन २’ ची संपूर्ण टीम स्टेजवर गेली, तेव्हा मात्र ती तिच्या ड्रेसला घेऊन चिंतीत झाली. स्टेजवर खुर्च्या मांडलेल्या होत्या. मात्र प्राचीच्या ड्रेसमुळे तिला त्यावर बसला येईना. कुठे काही गडबड होऊ नये, म्हणून प्राची धडपडतांना दिसली. याच चिंतेत ती अनेकदा श्रद्धासोबत इशाऱ्या इशाऱ्यात बोलताना दिसली. काही गडबड तर नाहीयं ना? असे तिने श्रद्धाला विचारले. श्रद्धाने हिरवा कंदील दिल्यावरच ती कुठे रिलॅक्स झाली आणि आरामात तिच्या खुर्चीवर जाऊन बसली. या कार्यक्रमात प्राचीने काळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल नव्हती, हे स्पष्ट दिसत होते.

‘रॉक ऑन २’मध्ये श्रद्धाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने प्राची नाराज झाली असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. मात्र ‘रॉक ऑन २’च्या ट्रेलर प्रदर्शनादरम्यान प्राची श्रद्धाला प्रोत्साहन देतानाच दिसली. त्या दोघींमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे, असे कुठेही दिसले नाही. त्या चांगल्या मैत्रीणी आहेत म्हणूनच अडचणीच्यावेळी श्रद्धा प्राचीच्या मदतीला धावून गेली ती त्यामुळेच!!

prachi-rock-on2

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 5:56 pm

Web Title: prachi desai afraid of wardrobe malfunction during rock on 2 concert
Next Stories
1 ..या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर आणि नागराज एकत्र येणार?
2 स्वप्निल जोशी झाला व्यसनाधीन?
3 सामान्यांना ‘ऐ दिल है….’ पाहणे ‘मुश्किल’?
Just Now!
X