News Flash

प्राजक्ता गायकवाडच्या ‘लॉकडाउन लग्न’ला सुरुवात, शेअर केला व्हिडीओ

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. आता प्राजक्ता एका चित्रपटात काम दिसणार आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

प्राजक्ता ‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत नवीन प्रोजेक्टला सुरुवात असे म्हटले आहे.

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये मास्क हा अंतरपाट म्हणून धरण्यात आला आहे आणि त्यावर आमंत्रण पत्रिकाही छापली आहे. तर ओवाळणीच्या ताटासोबत सॅनिटायझर, ऑक्सिमिटर ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘लंडनच्या लॉकडाउनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाइन’ असा आगळावेगळा विषय घेऊन चित्रपट येणार आहे. त्यामुळे एकूणच नेमकं या चित्रपटात काय घडणार, वा कथानकाचे स्वरूप काय असणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत.

‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटाची मजेदार कथा सुमीत संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटाचे डिओपी योगेश कोळी आहेत. या शिवाय या लग्नकथेला खरा साज चढवलाय तो ‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटातील गाण्यांनी. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अभिजीत कवठळकर याने पेलवली आहे. लॉकडाउन मधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला आहे. ‘लॉकडाउन लग्न’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला रसिक-मायबाप हजेरी लावून तितकेच प्रेम देतील अशी आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 6:52 pm

Web Title: prajakta gaikwad lockdown lagn new upcoming movie avb 95
Next Stories
1 ओळखलत का चिमुकल्याला? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय मॉडेल, अभिनेता
2 सलमानच्या ‘राधे’मध्ये एका माजी सैन्य अधिकाऱ्याने साकारली खलनायकाची भूमिका
3 प्रदर्शित होताच ‘राधे’ चित्रपटाने केला नवा विक्रम
Just Now!
X