स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. सध्या प्राजक्ता ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत झळकत आहे. विशेष म्हणजे करिअरसोबतच प्राजक्ता तिचं शिक्षणदेखील पूर्ण करत आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या प्राजक्ताने तिच्या परिक्षेतील एक गंमतीशीर किस्सा लोकसत्ता ऑनलाइनसोबत शेअर केला आहे.

दरम्यान, प्राजक्ता इंजिनिअरिंगचा पेपर द्यायला येणार असल्याचं समजातच तिच्या चाहत्यांनी कॉलेजबाहेर मोठी गर्दी केली होती. इतकंच नाही तर परिक्षा केंद्रावरील शिक्षण, पर्यावेक्षक आणि विद्यार्थी सगळ्याचंच लक्ष प्राजक्ताकडे वेधलं होतं. अनेकांना तिच्याशी बोलायचं होतं, फोटो काढायचे होते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला होता. यापरिस्थितीत प्राजक्ताला पेपर लिहितांना झालेल्या त्रासामुळे तिला पेपर लिहिण्यासाठी वाढीव अर्धातास मिळाला होता.