अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका फॅशन डिझायनरशी झालेल्या वादानंतर आता प्राजक्ता तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. हा पाहून प्राजक्ताचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली.

प्राजक्ताने #Throwback हा हॅशटॅग वापरत तिचा एक जुना फोटो पोस्ट केला होता. तिचा हा बॅकलेस फोटो मात्र नेटकऱ्यांना रुचला नाही. तुझे सगळे फोटो छान असतात, पण हा आम्हाला आवडला नाही, अशी कमेंट युजरने केली आहे. प्राजक्ताच्या इन्स्टाग्रामवरील इतर फोटोंच्या तुलनेत हा फोटो खूपच बोल्ड असल्याने नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये नाराजी बोलून दाखवली. तर प्रसिद्धीसाठी तुला असा फोटो पोस्ट करण्याची गरज नाही, असा टोलाही एका युजरने लगावला.

https://www.instagram.com/p/B6AJdRDDGcR/

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मधील चंदूचा ‘कबीर सिंग’ लूक पाहून नेटकरी झाले थक्क!

‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. काही सामाजिक कार्यक्रमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग असतो.