News Flash

“परत भोपळे चौक अवस्था”, फोटो शेअर करत प्राजक्ता माळी म्हणाली “परंतू करोनाने..”

प्राजक्ताच्या पोस्टला चाहत्यांची पसंती

(photo-instagram@prajakta_official)

आपल्या दिलखुलास हास्यने अनेकाच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने तिच्या अभिनयाने आजवर रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता सक्रिय असून तिचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर कायम तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी मोठी पंसती दिलंय. मात्र या फोटोपेक्षाही खास आहे ते प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना दिलेलं हटके कॅप्शन. या कॅप्शनमुळे प्राजक्ताची ही पोस्ट जास्त चर्चेत आलीय. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोत ती स्वयंपाक घरात काम करताना दिसतेय. चूल, पाण्याचा बंब, टोपल्या अशा गराड्यात ती बसलेली दिसतेय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, “परत भोपळे चौक अवस्था (घरी बसून भांडी घासायची वेळ आली ).” राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लॉकडाउन लावण्यात आलंय. शिवाय चित्रिकरणावरही बंदी आहे. याच पार्श्वभूमीवर प्राजक्ताने ही पोस्ट केलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

ही शिकवण आयूष्यभर लक्षात ठेवूया

या सोबतच पुढे तिने करोनाच्या काळात तिला काय शिकायला मिळालं हे सांगितलं. “गमतीचा भाग सोडा; परंतू करोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली. ही शिकवण आयूष्यभर लक्षात ठेवूया.” असं ती म्हणाली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी रिप्लॉय दिलाय. अगदी बरोबर कॅप्शन आहे असं म्हणत अनेकांची प्राजक्ताचं कौतुक केलंय.

‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 7:15 pm

Web Title: prajakta mali share old photo cooking said corona teaches how to manage money kpw 89
Next Stories
1 सलमान खानची मोठी घोषणा…,’राधे’च्या कमाईतून खरेदी करणार ऑक्सिजन सिलेंडर्स
2 ‘तारक मेहता…’ मध्ये पुन्हा जुन्या अंजली भाभीची एण्ट्री? सुनैनाने दिली प्रतिक्रिया
3 करोनाविरोधात लढाईसाठी एकवटली ‘RRR’ टीम; आलिया, अजय देवगणसह राम चरणचा स्पेशल मेसेज
Just Now!
X