23 November 2019

News Flash

माझ्या संपूर्ण आयुष्यात मी ही गोष्ट करु शकत नाही- प्राजक्ता माळी

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ती ही गोष्ट आयुष्यात कधीच करु शकत नाही असे म्हटले आहे

‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने तिच्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली आहे. सध्या प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान प्राजक्ताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ती ही गोष्ट आयुष्यात कधीच करु शकत नाही असे म्हटले आहे.

नुकताच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो प्राग (Prague), झेक रिपब्लिक येथील असल्याचे प्राजक्ताने सांगितले आहे. या फोटोमध्ये प्राजक्ता एका माहिलेच्या मागे उभी असून त्या महिलेने गळ्यात साप पकडला आहे. हा फोटो शेअर करत प्राजक्ताने ‘माझ्या संपूर्ण आयुष्यात मी ही गोष्ट करु शकत नाही. मी भगवान शंकर यांच्या गळ्यातील सापाचा टॅट्यू काढायचा विचार करत होते पण दुसरीकडे मला सापांची भीती वाटते’ असे तिने फोटो शेअर कॅप्शन दिले आहे.

यापूर्वीही प्राजक्ताचे सुट्ट्यांचा आनंद लुटतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हा प्राजक्ता इजिप्तला फिरायला गेली होती. आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढून प्राजक्ता फिरयला जाते यावरुन तिला भटकंतीची आवड असल्याचे म्हटले जात आहे.

First Published on June 25, 2019 6:01 pm

Web Title: prajakta mali share photo of her picnic prague czech republic avb 95
Just Now!
X