News Flash

“आमचं घर ही एक सामाजिक संस्था”, प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

गरजूंच्या मदतीसाठी प्राजक्ता माळी आली पुन्हा एकदा आली पुढे. व्हिडीओ शेअर करत सांगितलं 'आमचं घर' या संस्थेबद्दल.

प्राजक्ताने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Photo Credit : Prajakta Mali Instagram)

करोना काळात सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतं आहे. त्यात आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील पुढे आहे. प्राजक्ता पहिल्यांदा गरजूंच्या मदतीला धावून आली नाही तर या आधी देखील तिने बऱ्याच वेळा गरजूंची मदत केली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ती अनेक गरजूंची मदत करण्यासाठी पुढे आल्याचे दिसतं आहे.

प्राजक्ताने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ताने “आमचं घर” या संस्थेबद्दल सांगितले आहे. एवढंच नाही तर ही संस्था कशा प्रकारे गरजूंची मदत करते हे देखील सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हा व्हिडीओ शेअर करतं, “नमस्कार! मी सर्वांना विनंती करते की “आमचं घर” ही एक सामाजिक संस्था आहे, जी ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी, मुलांसाठी आणि ज्या वृद्धांना कोणीही आधार नाही त्यांना या संकट काळी मदत करण्याचे काम करत आहे. तरी “आमचं घर” ला त्यांचे हे समाज कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मदत कराल अशी आशा आहे. मी माझ्यापरीने एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हांसर्वांना विनंती करते की तुम्ही ही “आमचं घर” ला मदतीचा हात द्या,” अशा आशयाचे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना करोनापासून स्वत:चे कसे संरक्षण केले पाहिजे या बद्दल देखील सांगताना दिसते.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

प्राजक्ता ‘जुळून येतील रेशीम गाठी’ या मालिकेतून प्रकाश झोतात आली होती. मालिकांबरोबरच प्राजक्ता ‘खो खो’, ‘हंपी’, ‘डोक्याला शॉट’, ‘संघर्ष’ या चित्रपटांतसुद्धा प्राजक्ताने काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 8:04 pm

Web Title: prajakta mali talked about how the trust aamch ghar is going to help the needy people dcp 98
Next Stories
1 आई कुठे काय करते : संजना म्हणजेच रुपालीने सांगितल्या पावसाळ्यातील तिच्या आठवणी
2 ‘गोपी बहू’ अर्थात देवोलीना भट्टाचार्यने शेअर केला व्हिडीओ; फॅन्स संतापले
3 ‘इंडियन आयडलमध्ये अंजली गायकवाडला परत आणा’, नेटकऱ्यांनी केली मागणी
Just Now!
X