News Flash

Photo : ‘सांड की आँख’ मध्ये पुन्हा एकदा प्रकाश झा यांचा अभिनय

झा यांनी चित्रपटाच्या टीमसोबत फोटो शेअर केला आहे

प्रकाश झा

जगातील सर्वात वृद्ध शार्पशूटर चंद्रो तोमर आणि त्यांची नणंद प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित ‘सांड की आँख’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा देखील या चित्रपटाचा एक भाग होणार आहेत.

अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटाचं लवकरच चित्रीकरण करण्यात येणार असून या चित्रपटातून पहिल्यांदाच तापसी आणि भूमि एकत्र काम करणार आहेत. प्रकाश झा यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत काही शार्पशूटरदेखील दिसून येत आहेत.

‘माझ्या संपूर्ण टीमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांचा उत्साह या चित्रपटाचं प्रथम यश आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी माझी उत्सुकता कमालीची वाढली आहे’, असं झा यांनी फोटो शेअर करुन म्हटलं आहे.

‘जय गंगाजल’ या चित्रपटात प्रकाश झा यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. इतकंच नाही तर मलादेखील त्यांच्या अभिनयाची भुरळ पडली होती. या चित्रपटानंतर त्यांनी काही लघुपटांमध्येदेखील काम केलं. त्यामुळे सांड की आँखसाठी ते योग्य आहेत. ते या चित्रपटातील भूमिकेला नक्कीच न्याय देतीस’, असं अनुराग कश्यप म्हणाले. दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध पटकथा लेखक तुषार हिरानंदानी करत आहेत. सध्या मेरठमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 10:54 am

Web Title: prakash jha will enact a pivotal role in saand ki aankh
Next Stories
1 ‘या’ वेबसीरिजमधून करिश्मा करणार कमबॅक
2 थोडी तरी लाज बाळग, हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे सौंदर्या ट्रोल
3 शहिदांसाठी ‘भारत के वीर’ने अक्षयच्या मदतीने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी
Just Now!
X