News Flash

आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या ‘सायकल’चा ट्रेलर प्रदर्शित

केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदमसारखे नामवंत कलाकार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत

मराठी सिनेमा 'सायकल'

‘आपला मानूस’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर, वायकॉम१८ मोशन पिक्चर्स आता ‘सायकल’ हा पुढील मराठी चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. एका हलक्या फुलक्या कथेतून आत्मपरिक्षण करायला लावणारी अशी सायकलची कथा आहे. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो.

सिनेमात सायकलवर नितांत प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव हे दोन चोर एका घरात चोरी करतात. त्या घरातून पळून जाताना त्यांना केशवची सायकलही दिसते. हे दोघं केशवची सायकलही चोरतात. निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले? त्याला त्याची सायकल परत मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.

‘कॉफी आणि बरंच काही’, ‘अँड जरा हटके’ आणि ‘हंपी’सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही. येत्या ४ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2018 2:34 pm

Web Title: prakash kunte directed hrishikesh joshi priyadarshan jadhav bhalchandra kadam starrer marathi movie cycle trailer released
Next Stories
1 ‘मसान’ फेम अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
2 मराठी बिग बॉसच्या घरात ‘खंडोबा’?
3 साताऱ्याच्या या गावात अक्षय कुमार करतोय श्रमदान
Just Now!
X