News Flash

प्रकाश राज यांचा भाजपाला सणसणीत टोला, म्हणाले…

दिल्ली निवडणूकीच्या निमित्ताने भाजपावर पुन्हा एकदा निशाणा

गोळी, बिरणायी आणि दहशतवाद याशिवाय भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही का? असा सवाल अभिनेता प्रकाश राज यांनी मोदी सरकारला विचारला आहे. प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियाव्दारे मोदी सरकारच्या वादग्रस्त निर्णयांवर प्रतिक्रिया देताना दिसतात. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले प्रकाश राज?

“दिल्ली निवडणूक, गोळी, बिरणायी, दहशतवाद, आणि व्देष पसरवणारी भाषणे. भाजपाकडे सांगण्यासाठी या व्यतिरीक्त दुसरं काहीच नाही का? भाजपा तुम्हाला लाज वाटायला हवी.” अशा आशयाचे ट्विट करुन प्रकाश राज यांनी भाजपावर टीका केली आहे.

प्रकाश राज यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या दिल्या आहेत. काही भाजप समर्थकांनी त्यांच्या या ट्विटचा निषेध केला. तर विरोधकांनी त्यांना आपल्या पाठिंबा दर्शवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 2:18 pm

Web Title: prakash raj criticism on bjp over delhi election 2020 mppg 94
Next Stories
1 फक्त 10 मिनिटांसाठी ‘तो’ ड्रेस घालून दाखवा; ट्रोल करणाऱ्यांना हिना खानचं खुलं आव्हान
2 सावित्री जोती : जोतीराव -सावित्रीबाईंचा असा रंगला विवाहसोहळा
3 अनुराग कश्यप म्हणतो, CAA बाबत व्यक्त न होणाऱ्या कलाकारांना असते ‘ही’ भीती
Just Now!
X