News Flash

“याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

सरकारी जेवण नाकारणाऱ्या शेतकऱ्यांवर होतोय कौतुकाचा वर्षाव

कृषी कायद्यांमध्ये बदल करण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची भेट घेतली. मात्र विज्ञान भवनात आठ तास चाललेली ही बैठक अखेर निष्फळ ठरली. या बैठकीत कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान जेवणाच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून सरकारचं जेवण नाकारण्यात आलं. “आम्ही सरकरी जेवण किंवा चहा स्वीकारणार नाही. आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे”, अशी भूमिका चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. त्यांच्या या भूमिकेची प्रकाश राज यांनी स्तुती केली आहे. “याला म्हणतात खरा आत्म सन्मान” असं म्हणत त्यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे.

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

गुरूवारी झालेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यांवर ३९ आक्षेप केंद्रीय मंत्र्यांसमोर नोंदवले. त्यातील आठ आक्षेपांवर पुनर्विचार करण्याची व दुरुस्ती करण्याची तयारी मंत्र्यांनी दाखवली. शेतकऱ्यांचे आक्षेप मान्य असतील तर कायदे रद्द करण्याची मागणीही मान्य करावी, असे शेतकरी नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले, अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दिली. या बैठकीत, पंजाबसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी ४१ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 1:04 pm

Web Title: prakash raj farmers protest in delhi mppg 94
Next Stories
1 ‘लिज्जत पापड’ची यशोगाथा रुपेरी पडद्यावर; आशुतोष गोवारीकरांच्या चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची वर्णी
2 “तुम्हाला जळवण्यासाठी ही पोस्ट करतोय”; अभिनेत्यानं उडवली कंगनाची खिल्ली
3 “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा
Just Now!
X