24 October 2020

News Flash

‘प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या गिरीशबाप्पांच्या मागे प्रसिद्धीच अनाहूतपणे यायची’

चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणाऱ्या गिरीश कर्नाड यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

गिरीश कर्नाड

नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, लेखक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणाऱ्या गिरीश कर्नाड यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुतणे प्रमोद कर्नाड यांनी गिरीश कर्नाड यांच्या काही आठवणी जागवल्या आहेत.

‘प्रतिभावंत नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक पदमभूषण डॉ. गिरीश कर्नाड ज्यांना मी गिरीशबाप्पा म्हणून हाक मारायचो, ते महान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कलाकार निवर्तले. गिरीशबाप्पा कुटुंबवत्सलही होते. माझ्या मुलाच्या लग्नावेळी शूटिंग असतानाही वेळ काढून एक दिवसासाठी ते आले पण नातेवाईकांमध्ये रमत तीन दिवस राहिले.’

‘एकदा बेंगळुरूला मी ट्रेनिंगला गेलो होतो. मला न्यायला आलेले ते ट्रेनिंग इन्स्टिटयूटच्या बाहेर गाडीत बसून वाट पाहत होते व मी शेवटच्या निरोप सत्रात अडकल्याने बाहेर उशिरा पोहोचलो. तर त्यांच्या गाडीभोवती चाहत्यांची गर्दी जमली होती. बातमी आत ट्रेनिंग संस्थेत पोहोचली व प्राचार्य बाहेर पळत आले. गिरीशबाप्पा म्हणाले, “बघ प्रमोद, असं होतं. चल आता लवकर गाडीत बस.” ते प्रसिध्दीपासून लांब राहायचे पण प्रसिद्धीच अनाहूतपणे त्यांच्या मागे येत असे.’

‘मराठी,हिंदी,इंग्रजी बरोबरच संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. भास भवभूती कालिदास यांचं वाङमय त्यांना मुखोद्गत होतं. मृच्छकटिक नाटकावर त्यांनी उत्सव हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. शशी कपूर निर्माते होते. अलीकडे ‘टायगर जिंदा है’मध्ये रॉ चीफची भूमिकाही सुरेख केली होती. गिरीशबाप्पा आज नाहीत याचं फार दुःख होत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रात छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे कलावंत म्हणूनही ते ओळखले जायचे. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 3:30 pm

Web Title: pramod karnad on sad demise of veteran actor director girish karnad
Next Stories
1 शिक्षणावरून प्रश्न उठवणाऱ्यांना अनन्या पांडेनं दिले पुरावे
2 विराट प्रेमात पडावं असाच आहे; अनुष्कानं सांगितलं अनोखं कारण
3 ठाम भूमिका घेणाऱ्या गिरीश कर्नाड यांची उणीव भासेल: राज ठाकरे
Just Now!
X