लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वजण घरीच आहेत. लॉकडाउन जाहीर झाला तेव्हा कोणी परदेशात अडकलं तर कोणी इतर राज्यात. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लॉकडाउन घोषित करण्यात आला तेव्हा तिच्या माहेरी वडोदरा इथं होती. पण तिचा नवरा मुंबईत होता. अचानक घोषित झालेल्या लॉकडाउनमुळे तिला मुंबईत येता आलं नाही. ५० दिवसांनंतर ती घरी परतली. मात्र या काळात तिने स्वत:चं मन रमवण्यासाठी चित्रकलेचा छंद जोपासला. प्रार्थना खूप सुंदर चित्र काढते, पेंटिंग करते. या पेंटिंगचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

प्रार्थनाने मंडाला आर्ट, कॅनव्हास पेंटिंग केले आहेत. त्याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्रार्थनाच्या या कलेवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. एखादी कला जेव्हा तुम्ही जोपासता, तेव्हा तुम्हाला कधीच एकटं वाटत नाही, आणि यामुळेच प्रार्थनाने लॉकडाउनमध्ये कलेचा आधार घेतला आहे.

https://www.instagram.com/p/CApFUB7njRv/

https://www.instagram.com/p/CAkVAtTnMIj/

https://www.instagram.com/p/CAMqA8QlvMo/

आणखी वाचा : स्वप्निल जोशी चार वर्षांच्या मुलीला आतापासूनच शिकवतोय ‘ही’ कला

लॉकडाउनमुळे सर्व शूटिंग बंद असल्याने कलाकारांपासून रोजंदारीवर काम करणारे कर्मचारीसुद्धा घरीच आहेत. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबले आहे. परिणामी कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या नुकसानातून बाहेर येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी विनंती अनेक निर्माते आणि कलाकारांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.