मानसी जोशी

गणपती झाले की वेध लागतात नवरात्रीचे आणि नवरात्र म्हटलं की आठवतो तो नऊ दिवस खेळला जाणारा गरबा किंवा दांडिया हा नृत्यप्रकार. सगळे जण नवरात्रीमधील रास – दांडियाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. गणपती गेले की नवीन दांडिया, खास रास-गरब्याचे नवीन कपडे आणि गरबा-दांडिया खेळण्यासाठी वाजवली जाणारी गाणी इत्यादी गोष्टींना उधाण आलेले असते. मात्र यंदाची नवरात्र ही करोनाच्या सावटाखाली साजरी होणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील नवरात्रौत्सव व त्यात खेळला गेलेला गरबा, दांडिया अनेकांना यावर्षी आठवल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं बडोद्यातील दांडियाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल

“गेली दोन वर्षे मी नवरात्रीला लंडनमध्ये परदेशी चित्रपटांचे चित्रीकरण करत होते. यंदाही नवरात्रीला मी लंडनला चित्रीकरणात व्यग्र असेन. गणेशोत्सवाप्रमाणे यंदा नवरात्रही साधेपणाने साजरी करण्यात येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा तसेच दांडिया आयोजित करण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. माझ्या सासरी घट बसतात. माझ्या सासूबाई नऊ दिवस देवीची साग्रसंगीत पूजा करतात. नवरात्र म्हटले की मला गुजरातचा दांडिया आठवतो. बडोदा गरब्यासाठी जगप्रसिद्ध आहे. सुरत, अहमदाबाद, बडोदा येथील गरबा पाहण्यास देशभरातून लोक येतात. जगातील सर्वात मोठे गरबे गुजरातमध्ये होतात. मी मूळची बडोद्याची असल्याने नवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असे. बडोद्यात गरब्याला वेशभूषा, सर्वोत्कृष्ट दांडिया अशा स्पर्धा होतात. या स्पर्धामधील विजेत्यास रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, कूलर, मोबाइल फोन, टीव्ही अशी मोठी बक्षिसे मिळायची. त्यामुळे ती स्पर्धा जिंकण्यासाठी आमच्यात चढाओढ असे. नवरात्रीनिमित्त तेथील महाविद्यालये, कार्यालये लवकर सोडण्यात येतात. कॉलेजमध्ये असताना मी रात्रभर गरबा खेळत असे आणि सकाळी ५ वाजता थकूनभागून घरी येत असे. मात्र, आता ध्वनिप्रदूषणामुळे बडोद्यातील गरबे १२ वाजता बंद होतात. लहानपणी आम्ही नऊ दिवसांच्या नवरंगांप्रमाणे चनिया-चोली, घागरा, धोती, साडय़ा तसेच त्याला मिळतेजुळते दागिने घालून दांडिया खेळत असू. नवरात्री आल्यावर ते दिवस प्रकर्षाने आठवतात.”

सौजन्य- लोकप्रभा