23 February 2018

News Flash

PHOTO : या आहेत सौ. प्रार्थना अभिषेक जावकर

गोव्यात पार पडला लग्नसोहळा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: November 14, 2017 4:49 PM

छाया सौजन्य : प्लॅनेट मराठी/ ट्विटर

‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘फुगे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे आज दिग्दर्शक अभिषेक जावकरशी विवाहबद्ध झाली. डेस्टिनेशन वेडिंग असल्याने गोव्यात हा विवाहसोहळा पार पडला. प्रार्थना- अभिषेकचे कुटुंबीय, मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

११ नोव्हेंबरलाच प्रार्थना आणि तिचे कुटुंबिय गोव्याला रवाना झाले होते. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न असा तीन दिवसांचा हा सोहळा पार पडला. प्रार्थनाचा सर्वात जवळचा मित्र आणि ‘कॉफी आणि बरंच काही’मधील तिचा सहकलाकार वैभव तत्त्ववादी हासुद्धा आपल्या मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला आहे. त्यासोबतच ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील तिची सहकलाकार प्रिया मराठेसुद्धा या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

Prarthana Behere Mehendi & Haldi PHOTO :… असा होता प्रार्थना बेहरेच्या लग्नातील हळद आणि मेहंदी कार्यक्रम

लग्नानंतरच्या कॉकटेल पार्टीचाही एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. यामध्ये सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना अत्यंत सुंदर दिसते आहे. प्रार्थना- अभिषेकचं हे ‘अॅरेंज मॅरेज’ असून एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने या दोघांची ओळख झाली. ऑगस्टमध्ये त्यांचा साखरपुडा झाला.

First Published on November 14, 2017 4:49 pm

Web Title: prarthana behere ties knot with director abhishek jawkar
  1. No Comments.