News Flash

आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार

प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.

प्रसाद ओक, मंदार देवस्थळी

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. हा वितरण सोहळा आज (गुरुवार) सकाळपासूनच चर्चेत राहिला. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जात आहेत. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद अनुपस्थित राहणार असल्यानेच विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर मराठी कलाकार प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी हा पुरस्कार अखेर स्विकारला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. त्यामुळे हा बहिष्कार मागे घेतल्याचे चित्र दिसून आले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी या सावळ्या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘भारतातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेतानाचा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा असतो. पण तोच क्षण जर डावलला जात असेल तर ही वागणूक अपमानास्पद आहे असं वाटतं,’ अशा शब्दांत प्रसाद ओकने संताप व्यक्त केला. तर आतापर्यंत जी प्रथा सुरू होती ती याच वर्षी अचानकपणे मोडण्याचं कारण काय असा प्रश्न मंदार देवस्थळीने उपस्थित केला होता.

यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 5:29 pm

Web Title: prasad oak and mandar devasthali receives national film award from smriti irani rajyavardhan singh rathore
Next Stories
1 चीनची आक्रमकता! दक्षिण चीन सागरातील तीन तळांवर तैनात केली क्रूझ मिसाईल सिस्टीम
2 रिक्षाचालकाने दिला दगा, १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
3 जिन्नाच्या फोटोला विरोध करणाऱ्यांनी गोडसेच्या मंदिरालाही विरोध करावा – जावेद अख्तर
Just Now!
X