News Flash

‘माझ्या कर्णिकाचा काहीतरी पंगा झालाय..’; प्रसाद ओकची भन्नाट पोस्ट

वाचा संपूर्ण पोस्ट

मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. बुधवारी दिवसभर कंगना रणौतशी निगडीत बातम्याच सोशल मीडिया व माध्यमांमध्ये पाहायला मिळत होत्या. यावरून आपल्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जाणारा अभिनेता प्रसाद ओकने याने इन्स्टाग्रामवर एक भन्नाट पोस्ट लिहिली आहे.

‘माझ्या कर्णिकाचा काहीतरी पंगा झालाय…मी लोकांना फोन केला तर मला…आपल्याला कंगनाशी लढायचं आहे अशी कॉलर ट्यून ऐकू येते आहे,’ अशी पोस्ट प्रसादने लिहिली. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी खळखळून हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

काय आहे प्रकरण?

कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.

कंगनाच्या घरात १४ अनधिकृत बांधकामे केल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. काही ठिकाणी अनधिकृतपणे खोल्या उभारण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले होते. मात्र मुंबई महापालिकेने कालपर्यंत कोणतीही नोटीस पाठवली नाही. नूतनीकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, कंगना बाहेरगावी गेली असताना तिच्या घरात असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई केलीच अशी, अशी विचारणा करत पालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली, तर कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई नियमानुसार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 3:49 pm

Web Title: prasad oak funny post over kangana ranaut vs shivsena ssv 92
Next Stories
1 भारत गणेशपुरेंचा चोरीला गेलेला मोबाईल मुंबई पोलिसांनी शोधला; आभार मानताना अभिनेता म्हणाले…
2 …म्हणून प्रिया वारियरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल
3 ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ आता नेटफ्लिक्सवर
Just Now!
X