News Flash

प्रशांत दामलेंनी नाट्यरसिकांकडे केली ‘एवडुशी’ विनंती; म्हणाले…

वाचा काय म्हणतायत प्रशांत दामले....

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं थांबलेलं चाक पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी काही निर्मात्यांनी OTT प्लॅटफॉर्मचा रस्ता निवडला. त्यांनी आपले चित्रपट नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार या वेब प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केले. मात्र रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांचे बिकट दिवस अद्याप संपलेले नाहीत. त्यांना आणखी काही काळ रंगभूमी सुरु होण्याची वाट पाहावी लागू शकेत.

मात्र दिग्गज अभिनेते प्रशांत दामले याही परिस्थितीत कार्यरत आहेत. त्यांनी फेसबुकवर नाट्यरसिकांसाठी एक फॉर्म शेअर केला आहे. या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून ते रसिकांची आवड निवड, त्यांना कुठल्या प्रकारची नाटकं आवडतात, ही नाटकं ते कधी आणि कुठे पाहतात अशी सर्व माहिती ते गोळा करत आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रेक्षक अभियान सुरु केलं आहे.

रंगभूमी पुन्हा एकदा सुरु होताच प्रशांत दामले एक नवं नाटक घेऊन नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहेत. हे नाटक कुठलं असेल, त्याचं नावं काय, विनोदी असेल की गंभीर याबाबत त्यांनी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून त्यांनी रसिकांची आवड समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा फॉर्म सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 11:06 am

Web Title: prashant damle start audience campaign mppg 94
Next Stories
1 उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या
2 लहान मुलासोबत खेळतानाचा सुशांतचा व्हिडीओ व्हायरल…
3 तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणणाऱ्या चाहतीला आर. माधवनने विचारला प्रश्न
Just Now!
X