News Flash

एक चाहता असाही..

मराठी नाट्यसृष्टीतील विक्रमादित्य अशी प्रशांत दामले यांची ओळख आहे.

प्रशांत दामले

सध्या ‘तुमच्यासाठी काय पन’ या कलर्स मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या कार्यक्रमातील ‘गाजावाजा जंक्शनवर’ नुकतेच प्रशांत दामले येऊन गेले. सध्या ते ‘संशय कल्लोळ’ आणि ‘साखर खाल्लेला माणूस’ तसेच कलर्स मराठीवरील ‘आज काय स्पेशल’ या कार्यक्रमांमध्ये खूप व्यस्त आहेत. तरी देखील त्यांनी वेळात वेळ काढून गाजावाजा जंक्शनवर हजेरी लावली. ज्यामध्ये त्यांनी अनेक किस्से, आठवणी सांगितल्या.

वाचा : ड्रेसवर हजारो डॉलर्स खर्च करण्यापेक्षा वडिलांना मदत कर, मेगनच्या बहिणीने लगावला टोला

मराठी नाट्यसृष्टीतील विक्रमादित्य अशी प्रशांत दामले यांची ओळख असून त्यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांचे हजारो, लाखो चाहते आहेत, जे त्यांना आपला गुरु तसेच, प्रेरणास्थानी मानतात. त्यांचा असाच एक चाहता तुमच्यासाठी काय पनच्या मंचावर देखील आहे. ऋषिकेश विचारे हा कार्यक्रमामधील आर्ट डिरेक्शनच्या टीममध्ये असून तो प्रशांत दामले यांचा खूप मोठा चाहता आहे.

वाचा : हृतिक ठरला जगातील सर्वात ‘हॅण्डसम’ अभिनेता, हॉलिवूड अभिनेत्यांवर केली मात

ऋषिकेशने प्रशांत दामले यांच्यासाठी अनोखी भेट तयार काढली ती म्हणजे त्यांचा स्केच. हा अप्रतिम स्केच त्याने स्वत: काढला आणि त्यांना दिला. याबद्दलचा आनंद त्याने सोशल मीडियावरदेखील व्यक्त केला. हे स्केच काढण्यासाठी त्याला तब्बल ७२ तास लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 3:11 pm

Web Title: prashant damles sketch by his fan
Next Stories
1 मॉडेल अर्पिता तिवारीची हत्याच!
2 आलिया भट्ट, रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमाचे फोटो लीक
3 ड्रेसवर हजारो डॉलर्स खर्च करण्यापेक्षा वडिलांना मदत कर, मेगनच्या बहिणीने लगावला टोला
Just Now!
X