News Flash

प्रतिक बब्बर अडकला विवाहबंधनात

BSP नेत्याच्या मुलीसोबत केलं लग्न

बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बर कथित गर्लफ्रेंड सान्या सागरसोबत विवाहबंधनात अडकला आहे. मोजक्या व्यक्तींच्या हजेरीत लखनऊमध्ये विवाहसोहळा पार पडला. प्रतिक आणि सान्या यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सान्य सागर बसपा नेते पवन सागर यांची मुलगी आहे. ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा प्रतिक हा मुलगा आहे.

लखनऊमधील विवाह सोहळा पार पडल्यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. रिसेप्शनमध्ये बॉलिवूडपासून राजनेत्यांपर्यंत अनेक दिग्गज सहभागी होऊ शकतात.

२००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र अभिनय क्षेत्रात तो विशेष कामगिरी करु शकला नाही त्यानंतर प्रतीक बॉलिवूडमध्ये क्वचितच दिसला. गेल्या आठ वर्षांपासून प्रतिक आणि सान्या एकमेकांना ओळखत आहेत. मात्र, गेल्याच वर्षी लंडन येथे सान्या तिचे शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. तिच्याबद्दल फार काही माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी ‘आयएमडीबी बायो’नुसार (IMDb bio) लखनऊ येथे १ मे १९९० रोजी झाला. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून प्रशिक्षण घेतल्यानतंर तिने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध व्यक्तींसोबत सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 11:24 am

Web Title: prateik babbar and sanya sagars wedding pictures are out
Next Stories
1 ‘फुकटचा माज दाखवू नका, मी माफी मागणार नाही’
2 सुपरस्टारच्या कटआऊट्सवर दुग्धाभिषेकासाठी दूधाची चोरी, चाहत्यांमुळे विक्रेते तोट्यात
3 हनी सिंगच्या विदेशवारीला सशर्त परवानगी
Just Now!
X