नव्या वर्षांच्या सुरूवातीला बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर आज (२२ जानेवारी) सान्या सागरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लखनऊमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पुढचे दोन दिवस इतर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
२००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र अभिनय क्षेत्रात तो विशेष कामगिरी करु शकला नाही त्यानंतर प्रतीक बॉलिवूडमध्ये क्वचितच दिसला. प्रतीकची होणारी पत्नी सान्या ही लखनऊमधल्या राजकीय नेत्याची मुलगी आहे. सान्या २७ वर्षांची आहे. ती फॅशन डिझायनर आहे. सान्याने लंडन फिल्म अकॅडमीतून चित्रपट निर्मितीमध्ये पदवी घेतली असून ‘द लास्ट फोटोग्राफ’ या चित्रपटासाठी तिने प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून काम केलंय. याशिवाय, ‘इलेवन्थ अवर’ या लघुपटाच्या निर्मितीचंही काम तिने पाहिलंय. सान्या आणि प्रतीक गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्यावर्षी जानेवारी माहिन्यात या दोघांनी साखरपुडाही केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 1:38 pm