01 October 2020

News Flash

प्रवीण तरडे आणणार मराठी चित्रपटसृष्टीतला भव्य आणि महागडा चित्रपट

ड्रोन शूटिंगला सुरुवात झाली असून मराठी प्रेक्षकांना मिळणार ऐतिहासिक नजराणा

प्रवीण तरडे

दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने राज्यभरात धुमाकूळ घातला होता. त्यांच्याच लेखणीतून उभा राहिलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. ‘मुळशी पॅटर्न’नंतर ते कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्याचंच उत्तर प्रवीण तरडेंनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिलं.

मराठी चित्रपटसृष्टीतला भव्य आणि बिग बजेट चित्रपट प्रवीण तरडे घेऊन येत आहेत. शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रवीण तरडे आणि महेश लिमये सध्या रेकी करत आहेत. ‘मराठीत कधी दिसलं नाही असं काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे,’ असं तरडे म्हणाले.

येत्या १ नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून पुढच्या वर्षी तो प्रदर्शित होईल अशी माहिती तरडेंनी दिली. महेश लिमये यांनी प्रवीण तरडेंसोबतचा फोटो पोस्ट करत ‘स्वप्न सत्यात उतरवूया’ असं कॅप्शन दिलंय.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचेच असणार आहे. मात्र या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2019 12:57 pm

Web Title: pravin tarde big budget historical marathi movie ssv 92
Next Stories
1 ऋषी कपूर यांचा लहानपणीचा फोटो शेअर करुन नीतू कपूरची फेस अॅपवर टीका
2 ब्रेकअपनंतर पुन्हा जुळलं सूत, आरोहने सांगितली त्याची लव्हस्टोरी
3 Video : किसिंग सीन करणारी ‘ही’ ठरली पहिली बॉलिवूड अभिनेत्री
Just Now!
X