हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा पहिला पोस्टर शिवजयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला. ‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा’ अशा शब्दांत सरसेनापती हंबीरराव यांचे वर्णन करण्यात आले आहे.

‘छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्यासमोर हजर.. भव्यदिव्य शिवपरंपरा तुमच्यासाठी लवकरच.. ‘देऊळबंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’नंतर माझं लेखन दिग्दर्शन असलेला पुढचा ऐतिहासिक सिनेमा’, असं लिहित प्रवीण तरडेंनी हा पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरवरून सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत प्रवीण तरडेच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

actress raveena tondon marathi news
‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद

आणखी वाचा : ‘तान्हाजी’ चित्रपट पाहून हृतिक रोशन म्हणाला..

हंबीरराव मोहिते हे छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.