28 February 2021

News Flash

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात हा अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका; फर्स्ट लूक आला समोर

शिवजयंतीच्या मुहूर्तावर उलगडा झालेल्या व्यक्तिरेखेमुळे वाढली ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्कंठा

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करताच चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे स्पष्ट झाले असून फर्स्ट लूक समोर आला आहे.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

उर्वीता प्रोडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण? या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना आज मिळाले आहे. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अन्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्याबद्दलचे मोठे औत्सुक्य प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 12:54 pm

Web Title: pravin tarde sarsenapati hambirrao movie gashmir mahajani playing chhatrapati shivaji maharaj role avb 95
Next Stories
1 ‘मला सर म्हणू नका’, राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत स्वरा म्हणाली…
2 मुलगा की मुलगी? करीनाच्या घरी पोहोचले गिफ्ट्स
3 …म्हणून दिया मिर्झाने लग्नात कन्यादान करु दिलं नाही
Just Now!
X