16 July 2020

News Flash

“तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार”; प्रवीण तरडेंनी शेतकऱ्याला दिला शब्द

शेतकऱ्याच्या गव्हाच्या शेतीचा व्हिडीओ प्रवीण तरडेंनी फेसबुकवर पोस्ट केला.

प्रवीण तरडे

‘देऊळबंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’नंतर प्रवीण तरडेंचं लेखन- दिग्दर्शन असलेला ऐतिहासिक सिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ याची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास ते रुपेरी पडद्यावर उलगडणार आहेत. याच चित्रपटाचं नाव एका शेतकऱ्याने ‘ग्रास आर्ट’च्या स्वरुपात तयार केलं आणि त्याचा व्हिडीओ प्रवीण तरडेंपर्यंत पोहोचला.

प्रवीण तरडेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेतकऱ्याच्या शेतीचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओसोबत त्यांनी लिहिलं, ‘अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली. याला बहुदा ग्रास आर्ट म्हणतात.’ हे लिहित असतानाच तरडेंनी या शेतकऱ्याला शब्द दिला. ‘कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला, तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’, असं त्यांनी पुढे लिहिलं.

हंबीरराव मोहिते हे छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 9:24 am

Web Title: pravin tarde special post of a farmer who made grass art of his film name ssv 92
Next Stories
1 तारांगण घरात : अंतर्मुख होऊन जगाकडे बघताना..
2 भारतीने व्हिडीओ शेअर करत उडवली टिक-टिकटॉकर्स खिल्ली?
3 झी युवावर मनोरंजनाची मेजवानी!
Just Now!
X