मानधनाच्या बाबतीत प्रवीण तरडेच मराठीतला सुपरस्टार आहे अशी माहिती समोर आली आहे. प्रवीण तरडे हे एका सिनेमासाठी 50 लाखांचं मानधन घेतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी चित्रपटासाठी साधारण 45 ते 50 लाख मानधन घेतो, सई ताम्हणकर ही एका चित्रपटासाठी 20 ते 25 लाखांचं मानधन घेते अशी माहिती समोर आली होती. या दोघांप्रमाणेच अभिनेता अंकुश चौधरी 25 ते 30 लाख मानधन घेतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 15 ते 19 लाखांच्या घरात मानधन घेते. अभिनेता उमेश कामत 10 ते 11 लाख रुपये मानधन घेते. अमृता खानविलकर 10 ते 15 लाख रुपये मानधन घेते. अभिनेत्री प्रिया बापट 8 ते 10 लाख मानधन घेते. तर अभिनेता सुबोध भावे एका सिनेमासाठी 15 ते 20 लाखांचे मानधन घेतो ही माहितीही समोर आली होती. मात्र या सगळ्यांमध्ये अभिनेता प्रवीण तरडे 50 लाखांचं मानधन घेतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave
बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

कुंकू, पिंजरा, तुझं माझं जमेना, कन्यादान या मालिकांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. तर कुटुंब या सिनेमाची कथा त्यांनी लिहिली आहे. पितृऋण या सिनेमाची पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले आहेत. तर रेगे या सिनेमाचेही संवाद आणि पटकथा त्यांनी लिहिली आहे. मुळशी पॅटर्न या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन हे त्यांनी केलं आहे. या सिनेमात त्यांनी नन्याभाई हे पात्रही साकारलं होतं. देऊळ बंद आणि मुळशी पॅटर्न या दोन सिनेमांचं दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केलं आहे.