26 February 2021

News Flash

प्रेग्नंसी दरम्यान करीनाने पूर्ण केलं ‘लालसिंग चड्ढा’चे चित्रीकरण

करीनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

वर्षभरात एकच चित्रपट हे गणित कसोशीने सांभाळणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट करीना कपूर खान ‘लालसिंग चड्ढा’च्या चित्रीकरणासाठी पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत दिल्लीला रवाना झाली होती. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटवरचा एक फोटो शेअर करत चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.

‘आणि प्रत्येक प्रवासाचा एक शेवट ठरलेला असतो. आज मी लालसिंग चड्ढा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. माझ्यासाठी हे खूप कठिण होते. करोना, माझी प्रेग्नंसी आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या पण मी चित्रीकरण पूर्ण करण्याचा उत्साह आम्हाला थांबवू शकला नाही’ असे कॅप्शन करीनाने दिले होते.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. हा चित्रपट २०२१मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 7:35 pm

Web Title: pregnant kareena kapoor wraps up laal singh chaddha shoot avb 95
Next Stories
1 भानु अथ्थैया यांनी परत केला होता भारताचा ‘पहिला ऑस्कर’; कारण…
2 भारतासाठी पहिला ऑस्कर पटकावणाऱ्या भानु अथैया यांचं निधन
3 KBC 12: ५० लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नावर हारता हारता वाचला स्पर्धक, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
Just Now!
X