News Flash

पाहा गरोदर नेहा धुपियाचा रॅम्प वॉक

गरोदर असल्याची गोड बातमी नेहा धुपियाने सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर आज नेहा आणि पती अंगद बेदी यांनी लॅक्मे फॅशनमध्ये हजेरी लावली आहे. नेहा-अंगद यांनी

गरोदर असल्याची गोड बातमी नेहा धुपियाने सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर आज नेहा आणि पती अंगद बेदी यांनी लॅक्मे फॅशनमध्ये हजेरी लावली आहे. नेहा-अंगद यांनी रॅम्प वॉक करत सर्वांना अच्क्षर्याचा धक्काच दिला. लॅक्मे फॅशन वीकमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांना दाद दिली.

लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना नेहा-अंगद यांच्या चेहऱ्यावर पालक होणार असल्याचा आनंद झळकत होता. डिझायनर पायल सिंघालच्या फॅशन शोमध्ये आज नेहा-अंगद यांनी रॅम्प वॉक केला. रॅम वॉकच्या तयारीचा व्हिडीओ नेहाने इन्स्टाग्रॅमवर पोस्ट केला होता.

नेहा गरोदर असल्यामुळेच तिने आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अंगदशी इतक्या घाईने लग्न केल्याचंही म्हटलं गेलं. आता या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या असून नेहा लवकरच आई होणार आहे आणि आता हे जगजाहिर झालं आहे. खुद्द नेहाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ‘एक नवीन सुरुवात..’ असं कॅप्शन देत नेहाने अंगदसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नेहाचा बेबी बंप पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंगदनेही नेहाच्या गरोदरपणाविषयी होत असणाऱ्या चर्चा या पूर्णपणे खोट्या असल्याचं छातीठोकपणे सांगितलं होतं.

नेहा आणि अंगद यांच्या रिलेशनशिपविषयीसुद्धा फार कमी लोकांना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाचं वृत्तं हे अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेलं. १० मे रोजी दिल्लीत नेहा आणि अंगद विवाहबंधनात अडकले. नेहा ३७ वर्षांची आहे तर अंगद तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान म्हणजेच ३५ वर्षांचा आहे. अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 6:52 pm

Web Title: pregnant neha dhupia husband angad bedi walk the ramp see pics
Next Stories
1 रणबीर-आलियाच्या लग्नाच्या प्रश्नावर महेश भट्ट म्हणतात….
2 आदिनाथ कोठारेचं ‘ते’ फेसबुक अकाऊंट बनावट, पोलिसात तक्रार दाखल
3 पंतप्रधानांचा आदर केलाच पाहिजे – नवाजुद्दीन सिद्दीकी
Just Now!
X