बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून दूर असलेली प्रिती सोशल मीडियाद्वारे कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या ती क्वारंटाईनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामुळे चर्चेत आहे. तिने दुबईच्या हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “जर तुम्हाला क्वारंटाईनमध्ये राहून असं जेवण जेवायचं नसेल तर तुम्ही स्वत:ची काळजी घ्या.” अशा संदेश या व्हिडीओद्वारे तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – कंगना हिमाचलला परतली, जाता जाता पुन्हा मुंबईबद्दल बोलली

अवश्य पाहा – “अंकितावर आरोप करुन प्रसिद्धीचा प्रयत्न सुरु”; शिबानीच्या टीकेवर अपर्णाचं प्रत्युत्तर

करोनाचा कहर सुरूच; रुग्णांची संख्या ४८ लाखांच्या पुढे

भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असून एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील करोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी करोनावर मात केली आहे.