25 February 2021

News Flash

बुडणाऱ्या प्रितीला वाचवण्यासाठी धावला श्वान

त्याचे प्रयत्न पाहून प्रिती थक्क झाली

आपल्या निखळ हास्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री प्रिती झिंटाचा इन्स्टाग्राम, फेसबुकवर फारसा वावर नसतो. मात्र ट्विटरवर ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. अनेकदा तिचे ट्विट चर्चेचा विषयदेखील असतात. अलिकडेच प्रितीने ट्विटरवर तिच्या श्वानासोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करण्यामागे एक खास कारण असून सध्या सोशल मीडियावर या श्वानाचं कौतुक होत आहे.

कुत्रा हा इमानदार प्राणी असल्याचं आपण अनेक वेळा ऐकलं आहे. मात्र प्रितीला त्याचा प्रत्यय आला. तिच्या श्वानाने तिचे प्राण वाचवले. त्यामुळेच प्रितीने या कुत्र्याचा फोटो शेअर केला आणि सोबतच त्याने तिचे प्राण कसे वाचवले हे सांगितलं.

प्रिती जकुजीमधील पाण्यात बसली होती.मात्र तिला असं पाण्यात पाहून श्वानाला वाटलं की ती बुडतीये त्यामुळे त्याने पटकन जकुजीमधील पाण्यात उडी मारुन तिला  वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे प्रयत्न पाहिल्यानंतर प्रितीने ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली.

दरम्यान, प्रितीचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र आजही तिचे असंख्य चाहते आहेत. प्रितीने दिल से या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं होतं. प्रितीने हिंदी चित्रपटांप्रमाणेच तेलुगू, पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘सोल्जर’, ‘क्या कहना’, ‘चोरी-चोरी चुपके चुपके’, ‘दिल चाहता है’, ‘कोई मिल गया’, ‘कल हो ना हो’, ‘फर्ज’, ‘वीर जारा’, ‘सलाम नमस्ते’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘दिल है तुम्हारा’ या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 3:05 pm

Web Title: preity zinta dog saves her life from drowing actress tweet viral on social media ssj 93
Next Stories
1 Hacked trailer: पहिल्याच चित्रपटात हिना खान देणार हॉट सीन्स
2 या अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचं कळलं तीन दिवसांनी !
3 घटस्फोटित जोडीची हटके केमिस्ट्री; ‘त्या’ एका गोष्टीमुळे वारंवार येतात एकत्र
Just Now!
X