News Flash

सासूबाईंचा अनादर करणाऱ्यावर प्रिती झिंटा संतापली. म्हणाली…

प्रितीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काल ९ मे रोजी संपूर्ण जगात जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी सोशल मीडियावर त्याच्या आईचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी फक्त तिच्या आईचा फोटो शेअर केला नाही. तर, तिच्या सासूसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. मात्र, सासूसोबत फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.

प्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये प्रिती आणि तिच्या सासूने भारतीय संस्कृतीचे कपडे परिधान केले आहे. “माझ्या दुसऱ्या आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या स्वप्नांचा राजकुमाराला लहानाचे मोठे केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्यावर एवढं प्रेम केल्याबद्दल, मला मस्तीकरु दिल्याबद्दल आणि मला तुमच्या सुने पेक्षा मुलीसारखे सांभाळल्याबद्दस धन्यवाद,” अशा अशायचे कॅप्शन देत प्रितीने तो फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रितीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मात्र, काही नेटकऱ्यांनी या फोटोवरून तिला ट्रोल केले. एक नेटकरी म्हणाला, “हे सगळं लोकप्रियतेमुळे आहे. यामुळे कोणतीही सासू तुम्हाला मस्ती करायला शिकवेल.” ही कमेंट बघताच प्रिती म्हणाली, “कुटुंबात लोकप्रियता काम करत नाही, प्रेम आणि आदर करते”, असे सडेतोड उत्तर प्रितीने त्या नेटकऱ्याला दिले.

आणखी वाचा : ‘तारक मेहता..’मधील ‘या’ अभिनेत्याने मुलाच्या उपचारासाठी विकली अगरबत्ती आणि वर्तमानपत्रे

दरम्यान, प्रिती झिंटा ९ एप्रिल पासून आयपीएलमध्ये तिच्या किंग्स इलेव्हन पंजाब या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती. पंजाब ही टीम प्रिती झिंटाची आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 3:22 pm

Web Title: preity zinta gives slams troller who was rude to her mother in law dcp 98
Next Stories
1 सलमान खानच्या पोस्टवर संगीता बिजलानीची कमेंट; चाहते म्हणाले “भाभीजान”
2 ‘तारक मेहता..’मधील ‘या’ अभिनेत्याने मुलाच्या उपचारासाठी विकली अगरबत्ती आणि वर्तमानपत्रे
3 ऐश्वर्य ठाकरे आणि लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर पूजा बेदीचे वक्तव्य, म्हणाली…
Just Now!
X