News Flash

जेनेलियाने केली रितेशची धुलाई, व्हिडीओ शेअर करत प्रिती म्हणाली…

व्हिडीओमध्ये रितेश प्रितीला मिठी मारताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील ‘आदर्श कपल’ अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ पुरस्कार सोहळ्यामधील असून तेथे रितेश अभिनेत्री प्रिती झिंटाशी बोलताना तिला मिठी मारताना दिसतो. त्याच वेळी जेनेलिया तेथे उभी असते. घरी गेल्यावर जेनेलिया रितेशची पुरस्कार सोहळ्यातील वागणूक पाहून धुलाई करताना दिसते. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता यावर प्रिती झिंटाने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘हा खूप मजेशीर व्हिडीओ आहे रितेश आणि जेनेलिया.. असे व्हिडीओ बनवत रहा.. तुम्हा दोघांना खूप प्रेम’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

पाहा : ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीचा बिकिनी लूक, मालदीवमधील फोटो व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

जेनेलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला मिठा मारतो आणि तिच्याशी गप्पा मारताना दिसतो. त्याचवेळी जेनेलिया तेथे मागे उभी असते. ते पाहून जेनेलियाला राग येतो आणि घरी पोहोचल्यावर ती रितेशची चांगली धुलाई करत असल्याचे व्हिडीओमध्ये एडीट करुन दाखवण्यात आले आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जेनेलियाने छान असे कॅप्शन दिले होते. ‘व्हायरल व्हिडीओमधील प्रेमासाठी… रितेश आणि क्यूट प्रितीसाठी’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले होते.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम असताना रितेश आणि जेनेलिया रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये ते लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते नेहमीच सोशल मीडियवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 1:34 pm

Web Title: preity zinta react on genelia and ritiesh deshmukh video avb 95
Next Stories
1 फिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल?
2 Birthday Special : अल्का याज्ञिकने आमिरला काढले होते खोलीबाहेर
3 ‘अक्षयकडे आता २-३ वर्ष शिल्लक’, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत
Just Now!
X