News Flash

‘कधी विचारही केला नव्हता…’, रस्त्यातच उतरलेल्या विमानाचा व्हिडीओ शेअर करत प्रीति म्हणाली

प्रीतिने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका विमानाचे भर रस्त्यावर लँडिंग झाल्याचे दिसत आहे

एखाद्या विमानाने भर रस्त्यावर लँडिंग केल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटाने असेच काही तरी पाहिले आहे. तिने रस्त्यावर लँड झालेल्या विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

प्रीति झिंटा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच प्रीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका विमानाचे रस्त्यावर लँडिंग झाल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

आणखी वाचा : ‘त्याने माझा वापर केला’, शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा

व्हिडीओमध्ये प्रीति झिंटाच्या समोर असलेल्या रस्त्यावर एक लँड झालेले विमान दिसत आहे. विमानाच्या आसपास अनेकजण उभे असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रीतिने ‘प्रत्येक गोष्ट ही नेहमीच पहिल्यांदा होत असते. मी कधी विचारही केला नव्हता की ड्राइव्ह करत असताना रस्त्यावर एखादे विमान लँड होताना दिसेल. देवाच्या कृपेने सर्वजण सुरक्षित आहेत’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्रीति दिसली होती. या चित्रपटाचे नाव ‘भैयाजी सुपरहिट’ होते. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने सात वर्षांनंतर कमबॅक केला होता. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल, अरशद वारसी आणि श्रेयस तळपदे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:17 pm

Web Title: preity zinta share video plane land on road avb 95
Next Stories
1 अथिया शेट्टी व केएल राहुल इंग्लंडमध्ये एकत्र? इन्स्टा पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा
2 कोण ठरेल महाराष्ट्राची महागायिका?; सूर नवा ध्यास नवा-आशा उद्याची “महाअंतिम सोहळा”
3 ‘फॅमिली प्लॅनिंगबद्दल काय विचार?’ चाहत्याच्या प्रश्नाला अंकिताचे मजेशीर उत्तर
Just Now!
X