News Flash

प्रिती झिंटाचे लवकरच शुभमंगल; विवाहाच्या छायाचित्रांचे हक्क समाजकार्यासाठी दान

लग्नानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांसाठी मुंबईत लग्नाचा स्वागत समारंभ असेल

Preity Zinta, Gene Goodenough, ness wadia, wedding pictures, Bollywood, loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
Preity Zinta : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारा जेने व्यवसायाने ‘फायनान्शियल अॅनेलिस्ट’ असून प्रितीपेक्षा एक वर्षांनी लहान आहे.

बॉलीवूडची ‘डिंपल गर्ल’ अशी ख्याती असणारी प्रिती झिंटा जेने गुडेनफ या आपल्या अमेरिकन प्रियाकरासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रितीने काही दिवसांपूर्वी या वृत्ताचे जोरदार खंडन केले असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार, प्रिती आणि जेने थोड्याच दिवसांत अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये विवाह करणार आहेत. लग्नानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांसाठी मुंबईत लग्नाचा स्वागत समारंभ असेल, अशी माहिती आहे. दरम्यान, प्रिती आणि जेने या लग्नसोहळ्याची छायाचित्रांचे हक्क विकून त्यामधून आलेला पैसा सामाजिक कार्यासाठी दान करणार असल्याचीही चर्चा आहे. अतिशय गुप्तपणे पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यास दोघांच्या परिचयाच्या अतिशय जवळच्या व्यक्ती उपस्थित राहाणार आहेत.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारा जेने व्यवसायाने ‘फायनान्शियल अॅनेलिस्ट’ असून प्रितीपेक्षा एक वर्षांनी लहान आहे. त्याची आणि प्रितीची पहिली ओळख अमेरिकेत झाली. बऱ्याच काळापासून दोघांचे जवळचे संबंध आहेत. प्रितीच्या संघाचा उत्साह वाढविण्यासाठी यावर्षी जेनेने ‘आयपीएल’ सामन्यांना उपस्थिती लावली होती. याआधी प्रितीचे नाव प्रसिद्ध व्यावसायिक नेस वाडियाबरोबर जोडले गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2016 1:34 pm

Web Title: preity zinta to marry fiance gene goodenough couple will donate proceeds from wedding pictures to charity
Next Stories
1 ‘कहानी २’ च्या चित्रिकरणासाठी विद्या बालन उत्सुक
2 नागराज, कादंबरीच्या ‘दी सायलेंस’ने पटकावले बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे जेतेपद
3 …आणि ओबामांच्या भूमिकेसाठी बहुरूपी मिळाला
Just Now!
X