News Flash

‘चंद्रकांत चिपलुनकर’च्या घरी प्रेम चोप्रांची हजेरी

‘प्रेम नाम है मेरा..प्रेम चोप्रा’ हा संवाद लवकरच ‘चंद्रकांत चिपलुनकर सिडी बंम्बावाला’च्या घरामध्ये ऐकायला मिळणार आहे.

| November 2, 2014 06:53 am

‘प्रेम नाम है मेरा..प्रेम चोप्रा’ हा संवाद लवकरच ‘चंद्रकांत चिपलुनकर सिडी बंम्बावाला’च्या घरामध्ये ऐकायला मिळणार आहे. कारण, लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले व्यक्तिमत्त्व प्रेम चोप्रांचा प्रवेश मालिकेमध्ये होणार आहे.
मराठी नाटकांमधील लाडकी जोडी प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या हिंदीतील पदापर्णामुळे चर्चेमध्ये असलेली मालिका ‘चंद्रकांत चिपलुनकर..’ मध्ये प्रेम चोप्रा चंद्रकांत चिपलुनकरचे वडील गंगाराम चिपलुनकर यांच्या मित्राच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. चंद्रकांत चिपलुनकरच्या सोसायटीमध्ये एकेदिवशी एक बडी आसामी रहायला येते. त्या व्यक्तीचा रुबाब बघून सोसायाटीतील सर्वजण थक्क होतात. त्याचवेळी चंद्रकांतचे वडील ती व्यक्ती इतरकोणी नसून आपला मित्र प्रेम चोप्रा असल्याचे सर्वाना सांगतात आणि त्याला भेटायला त्याच्या घरी जातात. प्रेम चोप्राही आपला लहानपणाचा मित्र इतक्या वर्षांनी आपल्या घरी भेटायला आल्याचे पाहून आनंदीत होतात आणि घरातील इतर सर्वाची गंगारामशी ओळख करुन देतात.
प्रेम चोप्रा या मालिकेमध्ये एका पाहूण्या कलाकाराच्या भुमिकेत दोन भागांसाठी दिसणार असून ते प्रेम चोप्रा म्हणूनच मालिकेत दिसतील. याबद्दल सांगताना प्रेम चोप्रा म्हणाले, ‘टीव्हीवर मालिकेत काम करण्याचा ही माझी पहिलीच वेळ असून मला फार सुंदर अनुभव आला. जेव्हा मला या व्यक्तिरेखेसाठी विचारणा करण्यात आली तेव्हा एकतर खूप आनंद झाला. ही एक हलकीफुलकी विनोदी मालिका आहे आणि मालिकेतील सर्व कलाकारही छान असल्यामुळे मला काम करायला मजा आली’. प्रेम चोप्रांच्या मालिकेतील प्रवेशामुळे आता काय गमतीजमती होतील हे लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 6:53 am

Web Title: prem chopra at chandrakant chiplunkar home
Next Stories
1 ‘बाजीराव मस्तानी’साठी प्रियांकाला मराठीचे धडे
2 हृतिक रोशन, सुझानचा अखेर विभक्त!
3 ‘हॅप्पी बर्थ डे ऐश्वर्या’
Just Now!
X