06 July 2020

News Flash

‘प्रेम रतन धन पायो’ची पहिल्या दिवशी ४० कोटींची कमाई!

देशातील ४५०० चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झाल्यानंतर २१ दिवसांच्या कालावधीत प्रेम रतन धन पायोने देशात २०७ कोटींचा व्यवसाय केला होता.

दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४०.३५ कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी मिळवलेल्या या यशामुळे अभिनेता सलमान खानच्या नावावर आणखी एक विक्रमच नोंदला गेला आहे. सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. सलमानचा अभिनय, दिवाळीची सुटी आणि सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाचा पुर्वानुभव या जोरावर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्याचे दिसते आहे.


बॉक्स ऑफिसचे अभ्यासक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून पहिल्या दिवशीच्या कमाईची माहिती दिली. हिंदीतील ‘प्रेम रतन धन पायो’ने एकाच दिवसात ही कमाई केली आहे. यामध्ये तमीळ आणि तेलगू भाषेतील रुपांतराला मिळालेल्या प्रतिसादाची आकडेवारी अजून समजलेली नाही. देशातील ४५०० चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, परदेशातील ११०० चित्रपटगृहातही प्रदर्शित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2015 4:28 pm

Web Title: prem ratan dhan payo collects 40 cr on day one
टॅग Salman Khan
Next Stories
1 ‘प्रेम रतन धन पायो’च्या इंटरव्हलमध्ये मोदी सरकारचे प्रमोशन
2 दिवाळीची मज्जा आणि काहीशी प्रतीक्षा- योगिता चितळे
3 पाहा: ‘नटसम्राट’चा उत्कंठावर्धक टीझर
Just Now!
X