05 June 2020

News Flash

प्रेम रतन धन पायो आणि शाहरुखला ‘घंटा पुरस्कार’

'घंटा पुरस्कार २०१६' च्या विजेत्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली.

यंदाच्या ‘घंटा पुरस्कार २०१६’ च्या विजेत्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली. यात बॉलीवूडचा दबंग स्टार सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने सर्वात वाईट चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावलायं. तर शाहरुखला सर्वात वाईट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आलेयं.  बॉलीवूडमध्ये वर्षभरात वाईट कामगिरी करणा-यांना घंटा पुरस्कार दिला जातो.
बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करणा-या सूरज बरजात्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी सोनम कपूरला वाईट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. तर याचं चित्रपटाच्या शीर्षक गीताला वाईट गाण्याचा पुरस्कार मिळाला. यात सलमानच्या भावाची भूमिका करणा-या नील नितीन मुकेशला वाईट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला.
बॉलीवूड बादशाहा शाहरुखला ‘दिलवाले’ चित्रपटासाठी वाईट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आलायं. तर दिग्दर्शक विकास बहलला ‘शानदार’ चित्रपटासाठी वाईट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘हिरो’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये वाईट पदार्पण करणारा अभिनेता म्हणून सूरज पंचोलीचे नाव आहे. तर बिपाशा बसूला ‘अलोन’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी वाईट जोडीचा पुरस्कार मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 10:54 am

Web Title: prem ratan dhan payo shah rukh khan win ghanta awards
टॅग Salman Khan
Next Stories
1 ”वीरप्पन’ सुपरस्टार रजनीकांत यांचे अपहरण करणार होता’
2 ‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी अभिनेत्री राजश्री लांडगेचा पुढाकार
3 Sairat: ‘सैराट’ हा भारतीय चित्रपटसृष्टीचा नवा चेहरा- इरफान खान
Just Now!
X