24 September 2020

News Flash

प्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.

प्रेमानंद गज्वी

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावं चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

यंदाच्या नाट्य संमेलनाचे ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच त्याचादेखील घोषणा केली जाणार आहे. नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 3:28 pm

Web Title: premanand gajvi elected as chairman of akhil bhartiya marathi natya sammelan
Next Stories
1 Video : सई ताम्हणकरच्या पहिल्या वेब सीरिजचा टीझर पाहिलात का?
2 चाहत्यांसोबत साजरा झाला अमृताचा वाढदिवस
3 घटस्फोटानंतर वर्षभराच्या आतच ‘रोडिज’ फेम रघु चढणार बोहल्यावर
Just Now!
X