नववनीन वस्तूंची खरेदी करायला सर्वाना आवडते. खरेदी करताना भरघोस सवलत मिळाली आणि त्यावेळी आपली लाडकी अभिनेत्री तिथे असेल तर..? हा योग ‘लोकसत्ताने शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने जुळून आला.

‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये शुक्रवारी अभिनेत्री आणि ‘कलर्स-मराठी’ वाहिनीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ‘संयोगिता’ ही भूमिका साकारणाऱ्या शर्मिष्ठा  राऊ तने हजेरी लावली आणि ग्राहकांना आनंदाचा धक्का बसला. फेस्टिव्हलदरम्यान शर्मिष्ठाने स्वत:ही खरेदीचा आनंद लुटला आणि आलेल्या ग्राहकांशीही छान गप्पा मारल्या.

शर्मिष्ठाने शुक्रवारी ‘राणेज् पैठणी’ला भेट दिली. निनाद आणि पल्लवी राणे यांनी शर्मिष्ठाचे स्वागत केले. तिला निरनिराळ्या साडय़ा दाखवल्या. शर्मिष्ठाला सोनेरी रंग आवडतो. त्यामुळे सोनेरी रंगाची साडी खांद्यावर घेऊ न कशी दिसते? हे पाहण्याचा मोह तिलाही आवरला नाही. तिने गढवाल, महेश्वरी, पैठणी इत्यादी प्रकारांतील साडय़ा पाहिल्या. तर दुसरीकडे खरेदीला आलेल्या ग्राहकांशीही तिने साडय़ा आणि त्यांचे विविध प्रकार या विषयावर गप्पाही केल्या.

त्यानंतर तिने ‘पांडुरंग हरी वैद्य अँड सन्स ज्वेलर्स’ या दुकानाला भेट दिली. महेश वैद्य आणि उमागौरी वैद्य यांनी तिचे स्वागत केले. सोन्यामधील दागिन्यांचे विविध प्रकार, तिच्या आवडीनिवडींवर मनसोक्त गप्पा रंगल्या.

त्यानंतर अंग्रेजी ढाबा येथे तिने आपला मोर्चा वळवला. तिथली वेगळी वास्तुरचना, सुमधुर संगीत, सजावट पाहून ती थक्क झाली. कॉकटेल, मॉकटेल आणि फ्युजन खाद्यपदार्थ यासाठी हा ढाबा प्रसिद्ध आहे. शर्मिष्ठाने विविध पदार्थाची चव घेतली. तेथे राज सडवीलकर यांनी तिला हॉटेलची संकल्पना, जेवणाची माहिती दिली. मला खाण्याबरोबरच जेवण बनवायलाही आवडते, असे शर्मिष्ठाने सांगितले. तिला भेटण्यासाठी, तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठीही गर्दी झाली होती.

लग्नसराईच्या काळात खूप खरेदी होत असते. या खरेदीची गंमत द्विगुणीत करणारा हा उपक्रम आहे. आम्हाला प्रत्यक्ष कलाकारांना भेटण्याची संधी या निमित्ताने मिळते.

– रंजना साळुंके, लोकसत्ता वाचक आणि ग्राहक