28 February 2021

News Flash

प्रिती आणि राणीच्या मैत्रीमध्ये ‘या’ कारणामुळे पडली होती फूट

आज प्रितीचा वाढदिवस आहे. जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी...

एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांचा समावेश आहे. त्या दोघींच्या मैत्रीच्या कायम चर्चा रंगलेल्या असायच्या. पण एक दिवस असं काही झाले की त्यांच्या मैत्रीमध्ये फूड पडली. आज ३१ जानेवारी रोजी प्रिती झिंटाचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया प्रिती विषयी काही खास गोष्टी…

‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाच्या वेळी त्या दोघींची ओळख झाली. त्यानंतर दोघीही एकमेकींच्या खास मैत्रीणी झाल्या. प्रिती झिंटा नेहमी स्वत:ला आउटसायडर असल्याचे मानायची. राणीसोबत मैत्री केल्यामुळे तिची ओळख बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता शाहरुख खानसोबत झाली होती. तसेच त्यांच्यासोबतही चांगली मैत्री झाली होती.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी करिअरच्या सुरुवातीला एकत्र वर्ल्ड टूरवर गेल्या होत्या. त्यावेळी त्या दोघींमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली असल्याचे म्हटले जाते. पण चित्रपटांमध्ये स्पर्धा असल्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्याला तडा गेला. तसेच प्रितीला नेहमी वाटायचे की राणी तिच्यापेक्षा ऐश्वर्याच्या जास्त जवळ आहे.

‘चलते चलते’ चित्रपटासाठी सुरुवातीला शाहरुखने ऐश्वर्याला साइन केल्याचे म्हटले जाते. पण नंतर काही कारणास्तव ऐश्वर्याच्या जागी राणीला घेण्यात आले. त्यामुळे ऐश्वर्या आणि राणी यांच्या नात्यामध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच नंतर करण जोहरने ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी प्रितीला साइन केले तेव्हा राणीला वाइटले असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे हळूहळू त्या दोघी एकमेकीपासून लांब गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

त्यानंतर राणीने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील दोन अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रीणी होऊ शकत नाहीत असे म्हटले होते. तुम्ही एकमेकी विषयी कितीही चांगला विचार करा. पण जेव्हा चित्रपटांच्या ऑफरची वेळ येते तेव्हा तुम्ही एकमेकींच्या स्पर्धक होता असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 1:52 pm

Web Title: priety zinta birthday special rani mukherjee preity zinta avb 95
Next Stories
1 कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला, झरीन खानचा आरोप
2 प्रियांकाला मिळणार ऑस्कर?; तिच्या ‘आहों’नीच केली भविष्यवाणी
3 Video: लग्नानंतर नताशा आणि वरूण राहणार ‘या’ घरात
Just Now!
X