नुकताच नौदल सामर्थ्याचा प्रदर्शन सोहळा पार प़डला. या सोहळ्याला भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया हादेखील गेला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी चक्क आरवचा कान ओढला.
अक्षय कुमारने पंतप्रधान आरवचा कान ओढत असतानाचा फोटो ट्विट केला आहे. तसेच, त्याने लिहले आहे की, जेव्हा खुद्द पंतप्रधान आपल्या मुलाचा कान ओढत त्याला ‘गुड बॉय’ असे म्हणतात तेव्हा त्या मुलाच्या वडिलांसाठी तो अभिमानाचा क्षण असतो.

ट्विंकलनेही ट्विट करत ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे म्हटले.