News Flash

प्रिन्स हॅरी- मेगननं लग्नासाठी पाहुण्यांकडून मागितला अनोखा आहेर

पुढील महिन्यात प्रिन्स हॅरी- मेगन विवाह बंधनात अडकणार आहेत. शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली असून यासाठी जवळपास ६०० पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

प्रिन्स हॅरी- मेगननं लग्नासाठी पाहुण्यांकडून मागितला अनोखा आहेर
या लग्नसोहळ्यासाठी ६०० जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हॅरीने मेगनला लग्नाची मागणी घातली होती.

ब्रिटनमधल्या राजघराण्यात सध्या प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. जगभरातील मोजक्याच आणि प्रतिष्ठित व्यक्तींना विवाहसोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पुढील महिन्यात विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पण या सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांना प्रिन्स हॅरी आणि मेगननं आहेर न आणण्याची विनंती केली आहे. त्याऐवजी ठराविक रक्कम जगभरातील सात स्वयंसेवी संस्थाना दान करण्यात यावी असं दोघांनीही सुचवलं आहे. यात मुंबईतल्या मायना महिला या फांऊंडेशनचाही सहभाग आहे.

प्रसिद्धीच्या तुलनेत कमाई काहीच नाही, रणवीरच्या वडिलांची तक्रार

१९ मेला हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. मायना ही मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांसाठी काम करते. या भागातील गरीब महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचं काम हे संस्था करते. याव्यतिरिक्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नदेखील ही संस्था करते. हॅरी आणि मेगन यांनी गरीब जनतेसाठी काम करणाऱ्या जगभरातील अशा सात संस्थेची नेमणूक केली आहे त्यात मायना देखील आहे. सुहानी जलोटा यांनी २०१५ मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या निर्णयामुळे या संस्थेमार्फत जोडल्या गेलेल्या महिलांचं भविष्य नक्कीच उज्वल असेल अशी प्रतिक्रिया सुहानी यांनी दिली आहे.

या लग्नसोहळ्यासाठी ६०० जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हॅरीने मेगनला लग्नाची मागणी घातली होती. शाही घराण्यात घालून देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे हॅरीला मेगनशी लग्न करण्यासाठी ब्रिटनच्या राणीची रितसर परवानगी घ्यावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 5:15 pm

Web Title: prince harry and meghan markle ask guests to donate to a mumbai charity
Next Stories
1 या महिला गुप्तहेराने केले होते पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न
2 ‘हम साथ साथ है’मधील सलमानच्या सहकलाकाराला बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याच्या धमक्या
3 ‘नकळत सारे घडले’मध्ये दिसणार नेहाचा अनोखा अंदाज
Just Now!
X