28 February 2021

News Flash

..म्हणून मेगन आणि प्रिन्स हॅरी लग्नात आलेल्या कोट्यवधी किंमतीच्या भेटवस्तू करणार परत

विवाहसोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी अत्यंत महागड्या भेटवस्तू ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना भेट म्हणून दिल्या. यातल्या ७ मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास ६३

लग्नापूर्वी दोघांनीही अधिकृतरित्या पाहुण्यांना भेटवस्तू न आणण्याची विनंती केली होती.

हॉलिवूड अभिनेत्री मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात पार पडला. एखादी परिकथा भासावी तसा हा विवाहसोहळा होता. जगभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्यासाठी उपस्थित होते. तर हजारो संख्येनं सामान्य नागरिकदेखील विंडसर कॅसलच्या बाहेर जमले होते. या विवाहसोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी अत्यंत महागड्या भेटवस्तू ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना भेट म्हणून दिल्या. यातल्या ७ मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास ६३ कोटीं किंमतीच्या भेटवस्तू हे शाही जोडपं परत करणार आहे असं समजत आहे.

लग्नापूर्वी दोघांनीही अधिकृतरित्या पाहुण्यांना भेटवस्तू न आणण्याची विनंती केली होती. भेटवस्तूऐवजी जगभरातील काही स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य देऊ करण्याचं आवाहनही त्यांनी पाहुण्यांना केलं होतं. भेटवस्तू न आणण्याची रितसर विनंती करूनही अनेक पाहुण्यांनी त्यातून जगप्रसिद्ध कंपन्यांनी या दोघांना महागड्या भेटवस्तू पाठवल्या. यात आलिशान बॅग्स, महागडे स्विमसूट यांचाही समावेश आहे. काही वेबसाईटच्या माहितीनुसार कंपन्यांकडून आलेल्या विविध भेटवस्तूंची किंमत ही भारतीय मूल्याप्रमाणे जवळपास ६३ कोटींच्या घरात होती. शाही कुटुंबातील सदस्यानं कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू स्विकाराव्या याबद्दल काही नियम आहे. अर्थात लग्नासाठी कंपन्यांकडून आलेल्या भेटवस्तू या ब्रँड प्रमोशनसाठी असाव्यात, त्या जोडप्यानं स्विकारणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या ब्रँडचं प्रमोशन करण्यासारखं झालं आणि कोणत्याही ब्रँडचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रमोशन करणं हे शाही कुटुंबाच्या नियमात बसत नाही. म्हणूनच मेगन आणि प्रिन्स हॅरी लवकरच या भेटवस्तू परत करणार आहेत असं समजत आहे.

१९ मे रोजी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी राजकारणी वगळता जगभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 9:40 am

Web Title: prince harry and meghan markle will return their wedding gift
Next Stories
1 फेकन्युज : ‘फोटोशॉप्ड्’ ट्वीट मेवानींच्या अंगलट
2 फेकन्युज : ‘निपा’वर जेलसेमियम-२०० हा उपाय नाही..
3 Social Viral : काकांचा फुल गोविंदा स्टाइल डान्स पाहून तुम्हीही अवाक व्हाल
Just Now!
X