News Flash

ड्रेसवर हजारो डॉलर्स खर्च करण्यापेक्षा वडिलांना मदत कर, मेगनच्या बहिणीने लगावला टोला

अभिनेत्री मेगन मार्कल ब्रिटनच्या प्रिन्स हॅरीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे

मेगन मार्कल, प्रिन्स हॅरी

अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल गेल्या काही दिवसांपासून प्रकाशझोतात आली आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरीसोबत मेगन विवाहबद्ध होणार असून, सध्या ती राजघराण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावतेय. मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या साखरपुड्याचे वृत्त अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर या शाही जोडप्यावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या. मेगनने साखरपुड्या फोटोंमध्ये घातलेल्या ड्रेसपासून ते तिच्या अंगठीपर्यंत सर्वच गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंडमध्येही आल्या. पण, तिच्या बहिणीने मात्र नाराजीचा सूर आळवला आहे.

मेगन तिच्या साखपुड्याच्या ट्रेसवर हजारो डॉलर्स खर्च करु शकते. पण, कर्जबाजारी झालेल्या वडिलांना मात्र ती मदत करु शकत नाही, असे म्हणत सावत्र बहिणीने राजराण्याच्या भावी सूनेला म्हणजेच मेगनला टोला लगावला आहे. मेगनवर निशाणा साधत समंथा ग्रँट म्हणाली, ‘एका ड्रेसवर तू ७५ हजार डॉलर्स खर्च करु शकतेस तर तुझ्या वडिलांवर ७५ हजार डॉलर्स खर्च करण्यात काहीच हरकत नाही.’

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

मेगनचं शिक्षण असो, ज्या मनोरंजन विश्वात तिला पहिली नोकरी मिळाली त्यातील मोठमोठ्या व्यक्तींची तिला ओळख करून देणे असो, त्यांनी तिच्यासाठी खूप काही केले आहे. आज तिची जी ओळख आहे, त्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले आहेत. त्यामुळे तिने त्यांना मदत करावी, अशी अपेक्षाही समंथाने व्यक्त केल्याचे वृत्त ‘मिरर डॉट को डॉट युके’ने प्रसिद्ध केले.

समंथाच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मेगन आणि तिच्या वडिलांविषयी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली असून, तिने वडिलांची मदत करावी असा सूरही आळवला जात असल्याचे पाहायला मिळतेय. १९ मे ला शाही विवाह सोहळ्याला मेगच्या वडिलांची हजेरी लावणार का, याविषयीसुद्धा गेल्या काही दिवसांपासून बरेच प्रश्न उपस्थित केले जायचे. याविषयीच माहिती देत ते मेगनच्या विवाहसोहळ्याला जाणार असल्याचे समंथाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 2:37 pm

Web Title: prince harry fiancee american actress meghan markles sister slams her over engagement photo dress says she should help their bankrupt dad
Next Stories
1 Breathe trailer : आर. माधवनच्या ‘ब्रीद’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
2 शिक्षणव्यवस्थेचा सामना करण्यासाठी इमरान हाश्मी सज्ज
3 भविष्यात हिनाचे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही- शिल्पा शिंदे
Just Now!
X