News Flash

पृथ्वी’त मराठी नाटके!

प्रीतीश खंडागळे यांचे संगीत आणि मकरंद मुकुंद यांची प्रकाशयोजना आहे. हे नाटक २६ एप्रिलला संध्याकाळी साडेसहा वाजता सादर होईल.

नाटय़प्रेमींची पंढरी समजल्या जाणाऱ्या जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये येत्या मंगळवारी, २६ एप्रिल रोजी ‘अस्तित्व’ संस्थेतर्फे ‘अगदीच शून्य’ आणि ‘..बाकी एकाकी’ या दोन नाटय़कृतींचे प्रयोग सादर होणार आहेत.

यंदाच्या काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये गाजलेल्या युगंधर देशपांडे लिखित आणि रवींद्र लाखे दिग्दर्शित ‘अगदीच शून्य’ या नाटकात प्रायोगिक रंगभूमीवरील कसलेले कलावंत अक्षय शिंपी, अमोल कुलकर्णी तसेच झी टॉकिजच्या ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या आगामी चित्रपटातील नायक ऋतुराज फडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्रीतीश खंडागळे यांचे संगीत आणि मकरंद मुकुंद यांची प्रकाशयोजना आहे. हे नाटक २६ एप्रिलला संध्याकाळी साडेसहा वाजता सादर होईल.

त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अनेक नामांकने आणि पुरस्कार मिळवलेल्या ‘एक बाकी एकाकी’ आणि ‘दोन बाकी एकाकी’ या दोन नाटकांमधील निवडक कथा एकत्र करून यंदा ‘..बाकी एकाकी’ हा नवा रंगप्रयोग मंचित करण्यात आला आहे. संकेत तांडेल लिखित या प्रयोगाचे वैशिष्टय़ म्हणजे विविध कॉलेजांतील कलावंत आणि दिग्दर्शकांना एकत्रित आणून हा प्रयोग सादर होतो. पराग ओझा, कुणाल आळवे, सुशील जाधव, संकेत तांडेल आणि संजय जामखंडी दिग्दर्शित या प्रयोगात विभव राजाध्यक्ष, यशोमान आपटे, योगिता रानडे, भावेश टिटवळकर, वैभव पिसाट, श्रुती कांबळे, अभिजीत पवार आणि अमोल ताटे हे कलाकार काम करीत आहेत. हा प्रयोग २६ एप्रिलला रात्री साडेआठ वाजता होईल.

‘ट्रायसिक पार्क और टेराडीक्टीलका अंडा’ या संकेत तांडेल लिखित मूळ मराठी नाटकाचा हिंदी प्रयोग याच दिवशी दुपारी १२ आणि संध्याकाळी चार वाजता सादर होतील. लहान मुलांसाठी विशेषत्वाने होणाऱ्या या प्रयोगात अभिजीत पवार आणि संजय जामखंडी मुख्य भूमिकेत असतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 3:43 am

Web Title: prithvi theatre
Next Stories
1 मनोज वाजपेयीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
2 जलयुक्त लातूरसाठी रितेश देशमुखने दिला २५ लाखांचा निधी
3 मराठी बॉक्स क्रिकेट : डॅशिंग मुंबई” संघाचा दमदार जर्सी लॉन्च सोहळा
Just Now!
X